ग्रामपंचायत मोगरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य मोगरे, पर्यटन समृद्ध मोगरे"

मोगरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
2000
पुरुष
800
महिला
700
गृहसंख्या (घरांची संख्या):
300
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

मोगरे हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तहसीलमध्ये वसलेले एक गाव आहे . मौजे मोगरे गाव दारणा नदीच्या किनारी वसलेले असुन हिरवळीने नटलेला समृद्ध परिसर आहे . इगतपुरी तालुका पेशवे काळापासुन धरणांचा समृद्ध तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो . दारणामाई नदिच्या एक कुशीत विसावलेले चहुबाजुनी वेढलेले समृद्ध असे गांव मोगरे नदीच्या किनारी असल्याने पाणी व सिंचन क्षेत्रात गावाने प्रगती करून संपूर्ण शेती वागायती आहे. पावसाळ्यात महाराष्ट्राची भूक भागविणारी सुगंधाने वेड लावणारा नुसत्या वासाने भुक भागवणारी तांदुळाची  भातशेती मोगरे गावात केली जाते. सुप्रसिद्ध इद्रायणी, १००८, सिंधुर ,कोलम, हाळणकर अशा विविध जातीची भातशेती समनेरे गावात केली जाते . भातशेती म्हणजे अखंड कष्टाचेचे काम, बी पेरणी ,रोपे तयार करणे .गाळ तयार करणे ,भाताची लागवड वाकुन ओणव्या पध्दतीने भर पावसात केली जाते. इतके कष्टाचे काम  मोगरेकर शेतकरीच करू जाणे. महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणजे इगतपुरी तालुका इथे पावसाचे पडण्याचे प्रमाण जास्त असुन चार महिने  हलाखिचे जिवनमान जगत असतात. रस्त्याची दुर्दशा होवुन जाते .पावसामुळे आजारपणाचे  प्रमाण वाढत जाते ,या संकटांना मोगरेकर धिराने तोंड देतात. मोगरे हे मुंबई नाशिक महामार्गापासून ८ km अंतरावर आहे  .मुख्य बाजारपेठ घोटी असुन सर्व शेतकरी वर्ग आपली शेतीची साधन सामुग्री , भांडवल घेण्यासाठी घोटी येथे जातात .उन्हाळ्यात टोमाटो, काकडी ,झेंडू फुलाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते .एकुणतः शेतीने समृद्ध असे गांव आहे. प्रत्येक घरात दुधासाठी गाय आणि म्हशीचे पालन केले जाते . दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जाऊन डेअरी व्यवसायास चालना मिळते. बचतगटाच्या माध्यमातुन डेअरी प्रकल्प चालविले जातात. त्यामार्फत दुध, दही पनिर श्रीखंड हे पदार्थ बनवुन मुंबईच्या बाजारपेठन पाठविले जातात. घराघरांत दुधाची सुबत्ता असुन खावूनपिवुन सुखी असे गांव आहे.

                   गावाची समृध्द अशी अध्यात्मीक परंपरा आहे. गोपळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  गावात ७ दिवस अखंड नामजप सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण होते. ७ दिवस मोठ्या किर्तनकारांचे किर्तनसेवा बजावली जाते. शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो. ७ दिवसांचा उत्सव गांवकरी मोठ्या श्रद्धा भक्तीने लोकवर्गणी जमा करून गावाची समृद्ध परंपरा जपत असतात. त्याचप्रमाणे १५ मे ते 30 मे या दरम्यान हनुमान महाराज यांची जत्रा असते. जत्रा गांव मोठ्या उत्साहाने साजरा करून या कार्यक्रमांचा आनंद सर्व आबालवृद्ध घेतात पंचक्रोशीतुन नागरिक कष्टकरी, कामकरी महिला भगीनी मोगरेला येऊन घेतात .

  • मोगरे येथील अंगणवाडी व शाळा :-

समनेरे येथे एक जिल्हा परिषद शाळा  आहे .

  • गावातील अंगणवाडी
  • मोगरे गावामध्ये एकूण दोन अंगणवाडी आहेत. गावात नियमित अंगणवाडी कार्यरत आहे. अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.
  • अंगणवाडी येथे एक LCD टिव्ही, पंखा, वजन काटा, व वीज वापरण्यासाठी सोलर पॅनल, बसविले आहे.
  • जिल्हा परिषद शाळा
  • मोगरे मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो. तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
  • तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टर आणि LCD टिव्ही आहे. तसेच मुलांना शाळेतील विविध अभ्यासक्रम तसेच इतर कलाकृती दाखवली जाते त्यामुळे मुलांना नवीन काही तरी शिकण्याची संधी प्राप्त होईन.

 

  • गावातील प्रमुख व्यवसाय:- शेती, आमच्या मोगरे मध्ये मुख्ये पिक हे भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच भुईमुग ,सोयाबीन , वरई, नाचनी, हे पिक घेतले जाते. तसेच काही प्रमाणात बागायती पण केली जाते. प्रामुख्याने भात हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो व आमच्या जवळपास घोटी बाजार पेठेत तो भात विकला जातो. जो काही विकला जातो. त्यावर लहान-मोठ्या उद्योजकांनी शेतीपूरक उद्योग या परिसरात सुरू केल्यामुळे शेतक-यांसोबतच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.
  • ग्रामपंचायतीचे नाव – मोगरे ता.इगतपुरी जि.नाशिक
  • ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव:- श्रीमती प्रितम भटू सूर्यवंशी
  • सरपंच नाव:- श्री प्रताप विठ्ठल जाखेरे
  • ग्रा.पं. ची लोकसंख्या:- १६२० (२०११च्या जनगणनेनुसार)
  • मतदार संख्या :- स्त्री ६६२ पुरुष ७००   एकूण  १३६२  .
  • पाणीपुरवठा एकूण खातेदार :- (मार्च २०२५ पर्यंत)
  • कुटुंबांची संख्या :- NPH :- , APL:- , BPL :-     , PHH :-   एकुण :-
  • पाणी पुरवठा योजना
  1. योजनाच्या पूर्वीची परिस्थिती व सध्याची परिस्थिती

मोगरे गावात सन १९८० पूर्वी झिरे, व खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. त्यानंतर गावामध्ये एक सार्वजनिक बोरवेल २००१ साली मारण्यात आली  त्यामधून पाणी हे गावातील व्यक्ती तसेच महिला पाण्याचा उपयोग करतात. सन २०२१-२२ जिल्हा परिषदेकडून जलजीवन मार्फत दारणा धरण येथून पाण्याची लाईन करण्यात आली आहे. गावासाठी जलजीवन पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी २५००० लिटर क्षमतेची  पाणीटाकी बांधून देण्यात आली. गावांना वैयक्तिक नळ योजना या मधून देण्यात आली. आज रोजी पाणीपुरवठा सुरळीत होत आहे.

 

मोगरे येथे कसे पोहोचायचे

रेल्वेने

घोटी रेल्वे स्टेशन, पाडळी रेल्वे स्टेशन हे मोगरे जवळील रेल्वे स्टेशन आहेत. इगतपुरी रेल्वे स्टेशन (इगतपुरी जवळ), घोटी रेल्वे स्टेशन (इगतपुरी जवळ), लहवीत रेल्वे स्टेशन (भगूर जवळ), देवलाली रेल्वे स्टेशन (भगूर जवळ), नाशिक रोड रेल्वे स्टेशन (नाशिक जवळ) ही जवळच्या शहरांमधून पोहोचता येणारी रेल्वे स्टेशन आहेत.
रस्त्याने

इगतपुरी, घोटी ,भगूर, नाशिक ही मोगरे जवळील शहरे आहेत .परंतु घोटी हे शहर मुख्य बाजारपेठ असून तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते .घोटी वरून मोठ्या प्रमाणात ने -आन करणाऱ्या गाड्या उपलब्ध असतात

मोगरे जवळील पिनकोड

४२२४०३ (इगतपुरी), ४२२४०२ (घोटी), ४२१६०२ (कसारा (ठाणे))

मोगरे जवळील महाविद्यालये

न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज ,वाघेरे .कर्मवीर पंजाबाबा गोवर्धने कला, Comm., Sci. कॉलेज, इगतपुरी

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग

शेती व भूवापर

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती

मोगरे नळ योजना

आंगणवाडी मोगरे खेळणे वाटप

मोगरे ग्रामपंचात तर्फे साईकल वाटप

मोगरे ग्रामपंचात नळ योजना

स्मशान भूमीकडे जाणार रस्ता

धोबी घाट

गांव अंतर्गत रस्ता

स्मशान भूमी शेड

स्मशान भूमी स्वरक्षण भीत

स्मशान भूमी बैठक व्यवस्था

शाळेसमोरील परस बाग

कलोरीन वॉटर मशीन

जनावरांचा खोडा

जि परिषद शाळा मोगरे

गटार व्यवस्थापन

स्वछता मोहीम

मंदिरासमोर शेड

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

📲 मोगरे ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

फोटो गॅलरी